Home Uncategorized खिंड:व्हरवडे, तालुका राधानगरी येथे ट्रकला भीषण आग …

खिंड:व्हरवडे, तालुका राधानगरी येथे ट्रकला भीषण आग …

5 second read
0
0
621

कोल्हापूर – राधानगरी रोडवरील खिंडी:व्हरवडे तालुका राधानगरी येथील भाऊसाहेब हॉटेल जवळ शॉर्टसर्किटने ट्रकला भीषण आग लागली. यावेळी जणू बर्निंग ट्रेन या सिनेमाचीच आठवण आली.

या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे, ट्रक नंबर MH09-EL5684 हा सुनील कन्हैया घोरपडे रा. शाहूवाडी,जि. कोल्हापूर, यांच्या मालकीचा असून हा ट्रक कोल्हापूर येथून सिमेंट घेऊन बांदा या ठिकाणी जात होता. हा ट्रक खिंडी:व्हरवडे येथे आला असता भाऊसाहेब हॉटेल समोर रात्री 2:30 वाजता ट्रकने अचानक पेट घेतला, ही बाब ड्रायव्हरच्या लक्षात येताचं ड्रायव्हरने रस्त्याकडेला ट्रक लावून मदतीसाठी शोधा-शोध सुरू केली, पण पहाटे 4:00- 4:30च्या दरम्यान भोगावती साखर कारखान्याची अग्निशामक येऊन ही आग आटोक्यात आणण्यात आली, तोपर्यंत ट्रकचे आगीत फार मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने या प्रसंगात कोणतीही जीवित हानी झाली नाही, या पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहे..

के के न्यूज सरवडे प्रतिनिधी अमोल कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…