Home Uncategorized राजारामच्या निवडणुकीची कुस्ती बिंदू चौकात का..?

राजारामच्या निवडणुकीची कुस्ती बिंदू चौकात का..?

3 second read
0
1
688

काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंती ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बिंदू चौकामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी झाली.. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तसेच जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.. पण मध्येच महाडिक पाटील वादामुळे बिंदू चौकामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या वादाच मूळ कारण होतं राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकच. गेले कित्येक दिवस अप्रत्यक्षपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत एकमेकांना प्रश्नांच्या मालिकेत अडकवत हे राजकीय वलय चांगलच धूमसत होत.

त्यामुळे प्रत्यक्षपणे बिंदू चौकात आमने-सामने येण्याच धाडस महाडिक पाटील या दोघांनीही केल. यावेळी एकमेकांवर शड्डू ठोकण्यात आले. त्यामुळे ऐन जयंतीच्या दिवशी बिंदू चौकात राजकीय तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दोघांच्या अचानक घेतलेल्या सभेमुळे नेमका काय प्रकार घडला हे सुद्धा काही लोकांना माहिती नव्हत. खरंतर जयंतीच वातावरण असतानादेखील राजकीय घोषणांनी बिंदू चौक गजबजुन गेला. ऐन जयंतीच्या मुहूर्तावर एकमेकांवर राजकीय द्वेषातून कुरघोडी करण हे कितपत योग्य आहे हे कोल्हापूर जनतेला रुचणार का? असे प्रश्न आता निर्माण होत आहेत. निवडणूक जरी राजाराम कारखान्याची असली तरी बिंदू चौकाला राजकीय अड्डा करण्याची काहीही आवश्यकता नव्हती.असा सूर कोल्हापुरातील सामान्य नागरिकांच्या तोंडून उठताना दिसत आहे.

प्रतिनिधी कोल्हापुरी कारभार

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…