कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलंच तापले आहे पाटील विरुद्ध महाडिक वाद आता शिगेला पोहोचला आहे. बंटी पाटील यांनी महाडिक यांना तुम्ही बिंदू चौकात या आमोरासमोर होऊन जाऊदे म्हणाले.. त्यात आज सत्ताधाऱ्यांचा प्रचार शुभारंभ झाला. आणि बिंदू चौकात जाणं यावर शिक्कामोर्तब केला
बिंदू चौकात या , अमल महाडीकांच्या आव्हानाचा स्वीकार करून अजिंक्यतारा कार्यालयातून सातच्या सुमारास आमदार ऋतुराज पाटील बिंदू चौकाकडे ओपन टप जीपमधून निघाले. पण दसरा चौक येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांसह ऋतुराज पाटील यांना सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन थांबवले.
महाडिक जर बिंदू चौकात आले असतील तर आम्ही सुद्धा जाणारच! असा कार्यकर्त्यांनी हट्ट धरला. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ऋतुराज पाटील जीपमधून खाली उतरले.
चालत पुढे जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच ऋतुराज खाली उतरले आणि त्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले. एकीकडे पोलीस पुढे जाऊ नका, अशी विनंती करत असताना काही झाले तरी बिंदु चौकात जायचेच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ऋतुराज पाटील यांना विनंती केली. महाडीकांसह १५ कार्यकर्त्यानाच आम्ही बिंदु चौकात जायला परवानगी दिली आहे ,त्यामुळे आपण सुद्धा १५ कार्यकर्त्यांसह जावे असे सांगितले.
पण, महाडीकांच्या आव्हानास मी एकटा बास आहे , तुम्ही इथेच दसरा चौकात थांबा , मी एकटा बिंदु चौकात जाऊन येतो असे कार्यकर्त्यांना सांगितले, आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यानिमित्त, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बिंदू चौकात लोकांची गर्दी आहे. आजच्या दिवसाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊया ,अशी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर आपल्या गाडीत उभा राहून ते एकटे बिंदु चौकाकडे गेले, तेथे पोहोचताच डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा ते दसरा चौकात आले .
या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्याचे आभार मानले. राजारामची निवडणूक आपल्या हातातून निसटली आहे, लोकांचा आपल्यावर प्रचंड रोष आहे ,हे महाडीकाना कळले असल्याने त्यांच्याकडून आपले लक्ष विचलीत करायचे असे प्रकार पुढील आठवडाभरात घडणार आहेत. मी आजही सांगतो महाडिक कंपनी भ्याली आहे , त्यामुळेच आम्ही तिथे पोहोचण्या अगोदरच ते तिथुन पळून गेले, असा घणाघात ऋतुराज पाटील यांनी केला. कार्यकर्त्यांनी यावर एकच जल्लोष केला.



