भाजप सरकारच्या जनविरोधी कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करत हजारो जनसमुदायाच्या सहभागातून राधानगरी येथून जनसंवाद यात्रा सुरू झाली.या यात्रेत छत्रपती शाहू महाराज,महात्मा गांधींची वेशभूषा केलेल्या नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं होतं.हजारो लोकांच्या सहभागाने सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राधानगरी धरणस्थळावरील छत्रपती शाहू महाराज स्मारकास अभिवादन करून राधानगरी तालुक्यातील जनसंवाद यात्रेला सुरवात झाली.फेजीवडे,राधानगरी,सोन्याची शिरोली,कुडुत्री, गुडाळवाडी,कसबा तारळे या गावांमधून पदयात्रा काढण्यात आली.गावगावांच्या वेशीवर …
राधानगरी जनसंवाद यात्रेत भाजप सरकारच्या जनविरोधी कारभाराबद्दल आक्रोश, हजारो लोकांच्या सहभागाने सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद