शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. भारतीय विद्यापीठ महासंघ, दिल्ली (एआययू)आणि शिवाजी विद्यापीठ संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘अन्वेषण’ चे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्याच्या हेतून हा उपक्रम राबविण्यात आला. …
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प ‘अन्वेषण’ मध्ये अव्वल..