Home Uncategorized दोन मोटारसायकल स्वरांची समोरासमोर धडक – एक मयत शाहूवाडी- ओकोली

दोन मोटारसायकल स्वरांची समोरासमोर धडक – एक मयत शाहूवाडी- ओकोली

2 second read
0
0
2,210

मलकापूर प्रतिनिधी:

ओकोली ते शाहुवाडी जाणाऱ्या रोडवर बटरफ्लाय शाळेचे समोर २ मोटार सायकल समोरासमोर धडकल्याने ३६ वर्षे युवकाचा मृत्यू झाला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील ओकोली ते शाहुवाडी दरम्यान बटरफ्लाय शाळेच्या समोर रात्री ११ च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये २ मोटार सायकलस्वार यांची समोरासमोर जोरात धडक झाल्याने, गाडी क्रं. एम. एच. ०९ डी. एच . ३७३६ शाईन विकास महिपती पाटील वय ३६ रा. मान ता. शाहूवाडी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला.

यावेळी निष्काळाजीपणे मोटार सायकल चालवल्याने (मोटरसायकल क्रमांक एम.एच. १२ ए.वाय. ५५१२ स्प्लेंडर) हा अपघात झाला व अनिल पाटील हा स्वतःही जखमी झाला. या घटनेची नोंद शाहुवाडी तालुका पोलीस ठाणे येथे झाली. गुन्ह्याचा तपास पोलीस आंबले यांच्या आदेशाने अमित पाटील हे करीत आहेत.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…