Home Uncategorized शिरोळच्या छ.शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड.

शिरोळच्या छ.शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड.

4 second read
0
0
118

ऐतिहासिक शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याकरिता गठित करण्यात येणाऱ्या समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची व उपाध्यक्षपदी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठांच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट मोहीम सांगता समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्या संदर्भात चर्चा करणार असल्याची ग्वाही रावसाहेब देसाई यांनी दिली.

शिरोळ शहरातील तरुणांनी सोमवारी शिवाजी चौकातील शिवाजी तक्त येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी समिती व ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची एकमताने हात वर करून निवड केली. तर शिरोळ तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बोलवलेल्या बैठकीला शहरातील विविध तरुण मंडळाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे लोकवर्गणी गोळा करणे यासाठी लवकरच समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत कोल्हापूरचे जन्मजेयराजे घारगे देसाई यांनी शिरोळच्या अश्वरूढ उभारण्यासाठी पाच लाख रुपयांची देणगी आणि राहुल यादव यांनी स्व. दिनकरराव यादव यांच्या कुटुंबाकडून एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांच्या बरोबर शिरोळ नगरपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी गटाचे माजी नगरसेवक आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…