कोल्हापूर: ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत अँडमिन म्हणून काम पाहणाऱ्या महिलेस शुक्रवारी( दि. १८ ऑगस्ट) अटक करण्यात आली. श्रुतिका वसंत सावेकर-परीट असे तिचे नाव असून आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने काल ही कारवाई केली. निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल झालेल्या 27 संशयित आरोपीपैकी श्रुती सावेकर ही अटक झालेली सहावी व्यक्ती आहे. या प्रकरणाचा …