शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘शिक्षकांचा शिक्षकदूत’ निर्माण करण्याची गरज असून, मंगेश चिवटे हे त्यासाठी सक्षम पर्याय आहेत. आरोग्य क्षेत्रातील सामान्यांच्या प्रश्नांसाठी चिवटे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना माने म्हणाले, एखादे काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय चिवटे स्वस्थ बसत नाहीत. रात्री-अपरात्रीही सामान्य नागरिकांचे फोन उचलून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांप्रमाणेच शिक्षकांचे प्रश्नही ते ताकदीने मांडतील. शिक्षकांना …