Home Uncategorized एमएसईबी कार्यालयाने दिला बोकडाचा बळी – अ.नि.स.

एमएसईबी कार्यालयाने दिला बोकडाचा बळी – अ.नि.स.

4 second read
0
0
342

आज सत्यशोधक महान सुधारक क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. ज्या महात्मा फुले यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेला स्थान दिले नाही त्यांची आज जयंती पण आज शाहूवाडी तालुक्यातील मुख्य महावितरण एम एस ई बी कार्यालयामध्ये अंधश्रद्धेचा एक वेगळाच प्रकार, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी पाहिला.

वारंवार कार्यालयाकडून वीजपुरवठा खंडित होत असतो हा वीज पुरवठा सुरळीत चालावा या जागेत काही कटकटी न होता कायमस्वरूपी कामे होण्याच्या हेतूने एमएसईबी कार्यालयात ज्या ठिकाणी मुख्य एम एस ई बी कार्यालयाच्या डीपी आहेत त्या ठिकाणी बोकडाचा बळी देण्यात आला आल्याचे चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते भाई भरत पाटील यांनी सांगितले. एम एस ई बी इंजिनियर हे ज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर काम करत असतात. मग यांना हे अज्ञानाचे का सुचले असं खोचक सवाल ही त्यांनी यावेळी केला. यावेळी शाहूवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी असे अनिष्ट प्रकार कोणत्याही शासकीय कार्यालयात घडू नयेत याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक शिवाप्पा पाटील, भाई भारत पाटील, चंद्रकांत रेडेकर कार्याध्यक्ष अनिस शाहुवाडी, प्रकाश कांबळे, प्रा. सुहास नाईक, प्रा. निलेश घोलप, संदीप कांबळे, हारून सय्यद भाई, सुरेश खोत, राजू देशमाने आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

शाहूवाडी एम एस इ बी विभाग सहाय्यक अभियंता घाटे यांची प्रतिक्रिया – स्टाफच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…