Home Uncategorized हिरकमहोत्सवानिमित्य आजी- माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचा मेळावा

हिरकमहोत्सवानिमित्य आजी- माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचा मेळावा

2 second read
0
0
313

तळवडे येथील प्राथमिक शाळेचा हिरक महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा झाला. यानिमित्य माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा रंगला. शाळेच्या सुविधा साठी एक लाख रूपयेची देणगी यावेळी जमा झाली. शाळेची स्थापना केलेले नुरूद्दीन झांजी गुरूजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एम.आर.पाटील यांचे व्याख्यान झाले.

शाळेला साठ वर्षे पूर्ण होताना येथे सेवा केलेल्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. भारती पाटील यांनी केले. जेष्ठ शिक्षक शिवाजी रामा पाटील, उपसरपंच डी.जी.लांबोर, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल वायकूळ ,दिलीप देशपांडे यांची मनोगते झाली. यावेळी मुख्याध्यापक एन.बी.पाटील, माजी मुख्याध्यापक वाय.के.पाटील, गणेश शेलार, मुंबई मंडळाचे प्रमुख अनील हातणकर, मोहन पाटील, चेअरमन गणेश पाटील, मानोली सरपंच रामचंद्र पाटील, केंद्र समन्वयक राजेंद्र लाड, अध्यक्ष सुनिल घावरे, मारूती पाटील, अशोक माने आदी प्रमुख उपस्थित होते.

आभार सौ. वैष्णवी रेडीज यांनी मानले. सूत्रसंचालन तुकाराम मोरे यांनी केले. यावेळी स्नेह भोजन झाले. सायंकाळी विद्यार्थ्यांचा विविध कलागुणांचा कार्यक्रम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…