Home Uncategorized महाराष्ट्राच्या धवलक्रांतीमध्ये गोकुळचे फार मोठे योगदान – मा.नाम.अजितदादा पवारसो (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्राच्या धवलक्रांतीमध्ये गोकुळचे फार मोठे योगदान – मा.नाम.अजितदादा पवारसो (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

4 second read
0
0
857

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) संघाचा हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, गोकुळच्या पेट्रोल पंपाचे भूमीपूजन व ‘गोकुळ श्री’ पुरस्कार वितरण व हिरक महोत्सवी वर्षानिमित्य प्राथमिक दूध संस्था भेटवस्तू वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाम.अजितदादा पवारसो यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत सोमवार दि.२९/०१/२०२४ इ.रोजी गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळे अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. अनेक मोठमोठ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचे वरदान असून गोकुळ सारख्या संस्थांनी सहकारावर एक आढळ श्रद्धा ठेवून जिल्ह्याच्या राज्याच्या तसेच देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. गोकुळने दूध उत्पादकांना चांगला दूध दर देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रगतीत मोलाची अशी भर घातली आहे. महाराष्ट्राच्या धवलक्रांतीमध्ये गोकुळचे फार मोठे योगदान असून सहकारामध्ये गोकुळ उत्तम पद्धतीचा काम करणारा एक आदर्श दूध संघ आहे.

आज हिरक महोत्सवाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा टप्पा गोकुळ दूध संघाने गाठलेला असून हे अभिमानास्पद आहे. गोकुळ दूध संघाने अतिशय पारदर्शक कामकाज करत हा व्यवसाय किफायतशीर, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारा आणि शेतीसाठी खत पुरवठा करणारा असल्याचे दाखवून दिले. दूध संकलन आणि विक्रीसह दुधापासून वेगवेगळे पदार्थ निर्माण करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर दिला. भविष्यात गोकुळने दुग्ध व्यवसायामध्ये नवनवीन योजनांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे मनोगत व्यक्त केले. गोकुळ व दूग्ध व्यवसायाशी निगडीत आणि गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अुनदान प्रक्रियेत अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी दूर करण्यासंबंधी मंगळवारी, (३० जानेवारी) मंत्रालयात बैठक आयोजित केल्याचे सांगून दूध उत्पादकांना आश्वस्त केले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो म्हणाले कि ‘जिल्ह्याची माती व पाणी कसदार असल्याने येथील शेतकऱ्यांनी गोकुळला वैभव मिळवून दिले आहे. ‘उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे गोकुळ दूध संघाने मोठया शहरातील मार्केट कायम ठेवले आहे. मुंबई,पुणे व अन्य ठिकाणी गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला असून, दुधाची मागणी वाढत आहे यासाठी दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. खासकरून म्हैशीच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांपासून संचालक, नेते मंडळी पर्यंत प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. असे मनोगत व्यक्त केले .

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी स्वागत व प्रस्ताविक भाषणामध्ये गोकुळच्या ६१ वर्षाच्या हिरक महोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला व संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली तसेच शासनाच्या ५ रुपये गाय दूध अनुदान योजनेतील काही अटी शिथिल करण्यासंदर्भात मागणी केली. सदर कार्यक्रमावेळी नवीन अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाची कोनशिला उद्घाटन समारंभ, गोकुळच्या पेट्रोल पंपाचे भूमीपूजन व ‘गोकुळ श्री’ पुरस्कार वितरण व प्राथमिक दूध संस्था भेटवस्तू वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोकुळच्या वाटचालीवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.तर आभार संघाचे संचालक अजित नरके यांनी मानले.

या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाम.अजितदादा पवारसो, वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो, चेअरमन अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके,नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, के.डी.सी.सी.बँकेचे संचालक ए.वाय.पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्…