Home Uncategorized NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

4 second read
0
0
13

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वतीने NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक २० मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी चौक, कोल्हापूर येथे निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखून विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र शासन व संबंधित यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनावेळी जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने, साहिल पाटील, निखिल पाटील, पार्थ जगताप, साहिल जाधव, दिग्विजय डावरे, आदर्श देसाई तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील तळवडे येथे कारने मोटारस…