
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने सोमवार दि.०८/०१/२०२४ इ.रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारसो यांना महाराष्ट्र शासनाचे गाय दूध उत्पादन पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान संदर्भात प्रत्येक्ष कामकाजामध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन दवाखाने यांच्या सहभागाबाबत संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये वरील शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये पाच अनुदान जाहीर केले आहे. सदरचे अनुदान शेतकऱ्यांना बँक खात्यावर थेट वर्ग (डी.बी.टी)केले जाणार आहे. यासाठी दूध उत्पादकांना संबंधित सहकारी संस्थेने त्यांचे दुधाचे बिल रोख विरहित पद्धतीने (ऑनलाईन) अदा करणे बंधनकारक आहे. शिवाय या गाय उत्पादकांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी ईअरटॅग द्वारे व आधार लिंक भारत पशुधन पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या अनुदानाचा जिल्ह्यातील सर्व गाय उत्पादकांना लाभ व्हावा व अनुदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन व संकलन विभागाच्या वतीने सर्व दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने बिल अदा करण्याची व दुधाळ जनावरांची नोदणी आधार लिंक करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू केलेली आहे. परंतु या अनुदान देय कालावधीचा विचार करता ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद यांचासुद्धा सहभाग असणे आवश्यक असून आपल्या मार्फत संबंधित विभागास/अधिकारी यांना तसे आदेश निर्गमित व्हावेत जेणेकरून या शासकीय अनुदानाच्या लाभांपासून जिल्ह्यातील गाय उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाहीत असे निवेदन देण्यात आले . राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी गोकुळ युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनुदानापासून एकही उत्पादक वंचित राहू नये यासाठी या योजनेच्या प्रदेश कामकाजात पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद या यंत्रणांही सक्रिय कराव्यात’ यासाठी गोकुळच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेत, संबंधित विभागांना या कामात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या.१६ जानेवारीला २०२४ इ. रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे या बाबतच्या प्रत्यक्ष कामकाजा संदर्भात जिल्हातील दुध संघ प्रतिनिधी,जिल्हा सहाय्यक निबंधक अधिकारी दुग्ध , पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त आढावा मिटिंग घेण्यात येईल असे सांगितले यावेळी उपस्थित गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके ,अभिजित तायशेटे, सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे, कोल्हापूर पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ.एम एम शिंदे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर सहा.आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर,डॉ.वडगावे. गोकुळचेपशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, वारणा दुध संघाचे डॉ.वडजे उपस्थित होते.-


