Home Uncategorized ब्रिलियन्ट स्कूलची सलग १२ वर्षे दहावी परीक्षेचा १००% निकालाची उज्वल परंपरा कायम

ब्रिलियन्ट स्कूलची सलग १२ वर्षे दहावी परीक्षेचा १००% निकालाची उज्वल परंपरा कायम

4 second read
0
0
45

शिरोळ : प्रतिनिधी-

शिरोळ येथील रंगराव माने चॅरिटेबलं ट्रस्ट संचालित ब्रिलियन्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरोळ या स्कूलने याही वर्षी इ.१० वी च्या बोर्ड परीक्षेत सलग १२ वर्षे १००% निकालची परंपरा कायम राखत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या नेत्रादीपक यशामुळे शिरोळ परिसरामधून विद्यार्थी व शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ गुणवतेची परंपरा कायम राखत यंदाही निकालामध्ये घवघवीत यश संपादान केले आहे. गुणवत्ता यादीमध्ये कु. प्रांजल बिसुरे-पाटील, प्रथम क्रमांक (९५%), वेदिका बिरंजे, द्वितीय क्रमांक (९३%), अक्षरा हत्ती, तृतीय क्रमांक (९२%), शम्सतबरेज कुरणे, चौथा क्रमांक (९१%), मृणाल कोळी, पाचवाक्रमांक (९०%) गुण संपादन करून या विद्यार्थ्यांनी प्रथम गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

विशेष प्रविण्य गुणवत्ता यादीमध्ये कु. स्वराली ढवळे (८९%), सादिया मोमीन (८८%), हार्पिता कोळी (८७%), राजलक्ष्मी पाटील (८५%), रिया पाटील (८२%), आदर्श पुजारी (८२%), ऋतुराज पाटील (८१%), श्रेयश महाडिक, (७७%), आयान नदाफ (७६%), अभिनंदन चौगुले (७६%) या विद्यार्थ्यांनी या यादीमध्ये स्थान मिळविले.

विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन माने, संचालिका स्वाती माने, अॅड. तृप्ती माने, डॉ. पूजा माने, प्राचार्य पी. एस. काकडे, पर्यवेक्षक सौ. शहनाज शेख, मानसी पाटील, ज्योती बरगाले सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…