Home Uncategorized “सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

3 second read
0
0
63

कोल्हापूरमधील सेव्हंथ डे हायर सेकंडरी स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत 99 टक्के निकालाची भव्य कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या नावात आणखी भर पडली आहे
सेव्हंथ डे हायर सेकंडरी स्कूल, कोल्हापूर येथे यंदाच्या ICSE दहावी परीक्षेत 99% निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
या परीक्षेत आदिती परीट हिने 97.4% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर पियुष पाटील याने 93.4% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला आणि पार्थ गोसावी याने 90.4% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
बारावीमध्येही वैष्णवी खराडे आणि न्यूझहत शेख यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढवला आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी प्राचार्य टी. मोहनराव, मुख्याध्यापक मनोहर कर्नाड, मुख्याध्यापक विनोद आवळे, खजिनदार सुहास विल्सन, पर्यवेक्षक सुनील घाटगे, दिलीप दलपती, कमल नासकर, पर्यवेक्षिका जेनिफर लंका, नीता नाडे आणि नीता दीक्षित यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

हुपरी नगरपरिषदेच्या हद्दीत अतिक्रमणांविरोधातील कारवाई सध्या संथ गतीने सुरू असल्याने नागरिक…