Home Uncategorized बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

4 second read
0
0
5


शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळची सुकन्या कु. शांभवी श्रीकांत माळकर हिने मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ५६४ म्हणजे तब्बल ९४% गुण प्राप्त करून कोल्हापूर विभागातील शिरोळ केंद्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

इयत्ता १२ वी कला शाखेत शिकणाऱ्या कु. शांभवी माळकर हिने १० वी च्या परीक्षेतही ९६.४०% गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले होते. १२ वी परीक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम आलेल्या शांभवीला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी, विजयसिंह शिक्षण प्रसारक मंडळ, शिवस्फुर्ती व्याख्यानमाला समिती ,राधा महिला सोशल फाउंडेशन ,स्व -परिवर्तन फाउंडेशन, व्हिजन आयडॉल्स करिअर & सेल्फ डेव्हलपमेंट अकॅडमी अशा शिरोळ व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी कु. शांभवी माळकर हिचे विशेष अभिनंदन केले आहे.

कु. शांभवी ही सुप्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा. श्रीकांत माळकर यांची सुकन्या व युवा वक्त्या प्रज्ञा माळकर यांची भगिनी असून महाराष्ट्रातील अनेक नामांकित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही तिने उत्तुंग यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…