Home Uncategorized विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी रोटरीचा स्तुत्य उपक्रम : पृथ्वीराजसिंह यादव

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी रोटरीचा स्तुत्य उपक्रम : पृथ्वीराजसिंह यादव

4 second read
0
0
207

आपल्या पाल्याची व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता वाढावी यासाठी पालक, व शिक्षक जादा मार्गदर्शन करुन वर्षभर धडपड करीत असतो. शिष्यवृत्ती सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी, समजून असणाऱ्या त्रुटी भरून निघेल. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त शिरोळ तालुक्याचे नाव जिल्ह्यात करण्यासाठी प्रयत्न करतील.

यासाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांनी सराव परीक्षा घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना दिली, असे प्रतिपादन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले. छ. शिवाजी महाराज जयंती व दिनबंधू दलितमित्र माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गाकरिता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारीसाठी शिरोळ तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पृथ्वीराजसिंह यादव हे बोलत होते.

शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला. परीक्षेतील प्रथम क्रमांक – नम्रता नंदकुमार कोळी (शिरोळ), द्वितीय क्रमांक – श्रावणी विकास पोवार (राजापूरवाडी),तृतीय क्रमांक – शंतनु रमेश खोत (अब्दुल लाट), उत्तेजनार्थ – मेघा अजितकुमार आपिने (गणेशवाडी), अक्षरा युवराज घोरपडे (शिरोळ), प्रांजल दादासाहेब पाटील(अब्दुल लाट), प्रज्योत प्रफुल पाटील (कुरुंदवाड), संचिता गजानन खोत (शिरोळ) या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षेसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच या समारंभात काखे येथील अविनाश सातवेकर यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे यांनी स्वागत केले. इव्हेंट चेअरमन डॉ.अतुल पाटील यांनी प्रस्ताविक केले.सदस्य प्रा. काशिनाथ भोसले यांनी आभार मानले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत, अनिल ओमासे, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे, रोटरी हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी तुकाराम पाटील,ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे,सदस्य -राहूल यादव,संजीव पुजारी,परशराम चव्हाण,विराज यादव,चंद्रकांत भाट,उल्हास पाटील,सचिन सावंत,विवेक फल्ले,काशिनाथ भोसले,सनी सुतार दिलीप शिरढोणे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी, मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र,पद्माराजे विद्यालय, यादव परिवार शिरोळ,मातोश्री चाईल्ड क्लिनिक यांच्या सहकार्याने ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…