Home Uncategorized “आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

4 second read
0
0
50

सांगली -मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील मूलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, उद्याने आणि स्वच्छता या मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली. महायुतीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस व्यक्त करत, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नियोजनबद्ध कामे हाती घेण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. “निवडणुकीपूर्वी शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत होता, मात्र आम्ही निवडून आल्यानंतर तो विस्कळीत का? केल्याय” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.बैठकीनंतर महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी शहरातील नाल्यांची पाहणी केली.साचलेला कचरा, अडथळे आणि स्वच्छतेच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्वरित दुरुस्ती व स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले.नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय व्हावे,असेही निर्देश देण्यात आले. महानगरपालिकेत पक्ष बैठक आणि त्यानंतर शहरातील नाल्यांची पाहणी करून जनतेच्या प्रश्नांचा प्रत्यक्ष आढावा घेत आहोत.‘स्वच्छ सांगली, सुंदर सांगली’ हेच आमचे ध्येय आहे,” असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…