Home Uncategorized शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

3 second read
0
0
14

शिरोळ : कुणाल कांबळे

शिरटी ता. शिरोळ येथील जागृत देवस्थान ऐतिहासिक ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचे बांधकाम, रंगकाम व सुशोभीकरण पूर्ण झाल्याबद्दल सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी पालखी प्रदक्षिनेवेळी मंदिरावर आणि पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त देवस्थान मंदिरावरदेखील पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या पुष्पवृष्टीचे मुख्य सहा सवाल शिरटीतील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, भक्तगण, तसेच भैरेश्वर भक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आले. संगीतकार सचिन चौगुले संगीतमय कार्यक्रमाच्या साथीने हे सवाल काढण्यात आले.

पहिल्या क्रमांकाच्या सौधर्म यजमान सवालाचे मानकरी श्री. उल्हास पारिसा चौगुले हे ठरले. त्यांनी १ लाख ५१ हजार १५१ रुपयाला हा सवाल धरला. त्यांना पुण्याहून शिरटीकडे येण्याचा मान मिळणार आहे. तर सहाव्या क्रमांकाच्या इंद्रध्वज श्री. महादेव दादू माळी हे ठरले. त्यांना भैरेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करून पुण्याकडे जाण्याचा मान मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या धनपती कुबेर सवालाचे मानकरी श्री. अशोक आप्पासो चौगुले हे ठरले. त्यांनी १ लाख १५ हजार ११५ रुपयांना या सवालाची बोली लावली. तिसऱ्या क्रमांकाच्या ईशान इंद्र सवालाचे मानकरी सौ. शारदा सिद्धप्पा घालवाडे या महिला ठरल्या. त्यांनी या सवालासाठी १ लाख १ हजार १११ रुपयांची बोली लावली. चौथ्या क्रमांकाच्या कल्पेंद्र सवालाचे मानकरी सौ. रुपाली सुहास राजमाने या ठरल्या. त्यांनी या सवालासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावली. पाचव्या क्रमांकाच्या कामदेव सवालाचे मानकरी सौ. विमल मिरजे या ठरल्या. त्यांनी १ लाख १ हजार १११ रुपयांना या सवालाची बोली लावली. सवालाचा कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते.

यावेळी प्रवीण रावसो गतारे व संदीप बापू मगदूम यांनी आहार दानासाठी १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी यात्रा कमिटीककडे सुपूर्द केली. दरम्यान, ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरातील मानकऱ्यांचा तसेच मंदिरात नवरात्र उत्सवातील उपवासाला बसणाऱ्या भक्तांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

दरम्यान, या हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्याचा जास्तीत – जास्त भाविक भक्तांना मिळावा यासाठी लकी – ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे. भैरेश्वर यात्रेच्या निमित्ताने जे भाविक १ हजार १०० रुपयांची देणगी देऊन पावती करतील, अशा भक्तांमधून तीन भाग्यवान भक्तांच्या कुटुंबाला हेलिकॉप्टरवरून श्री भैरेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याचा बहुमान मिळणार आहे. दरम्यान, या लकी ड्रॉ योजनेत जास्तीत – जास्त भक्तांनी सामील होऊन भैरेश्वर मंदिरांच्या उर्वरित सुशोभीकरण कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री भरेश्वर बांधकाम कलशारोहण, सुशोभीकरण व युवक यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी भैरेश्वर युवक यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रमोद उदगावे, उपाध्यक्ष शिवम लंबे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी, उपसरपंच प्रकाश माळी, सतीश चौगुले, अशोक चौगुले, अनिल रोजे, विनोद मगदूम, राजकुमार शिरगावे, निखिल पाटील, रविराज पाटील, संदीप रोजे, कुलदीपक बनीजवाडे, अमित शिरगावे, संदीप चौगुले, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, प्रकाश उदगावे, रावसाहेब मगदूम, ओंकार चौगुले, शीतल पाटील, प्रकाश पाटील यासह श्री भैरेश्वर बांधकाम, कलशारोहण, सुशोभीकरण व युवक यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

शिरोळ : कुणाल कांबळे नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निका…