Home Uncategorized मलकापूरमध्ये आठवडा बाजाराला नवसंजीवनी “शुक्रवारसोबत आता मंगळवारीही” आठवडा बाजार सुरू

मलकापूरमध्ये आठवडा बाजाराला नवसंजीवनी “शुक्रवारसोबत आता मंगळवारीही” आठवडा बाजार सुरू

5 second read
0
0
203

मलकापूर :

मलकापूर शहरात पूर्वीपासून दर शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारास आता नवसंजीवनी मिळाली असून, शहराच्या व्यापारवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत मंगळवारपासूनही आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे.आज मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 पासून मलकापूर नगर परिषदेच्या पुढाकाराने मंगळवारी आठवडा बाजार सुरू झाला असून, यापूर्वीप्रमाणे शुक्रवारी भरविला जाणारा आठवडा बाजार नियमित सुरूच राहणार आहे.

त्यामुळे आता मलकापूर शहरात आठवड्यातून दोन दिवस — मंगळवार व शुक्रवार — आठवडा बाजार भरविला जाणार आहे.या निर्णयामुळे स्थानिक भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, किरकोळ व्यापारी यांना व्यवसायाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून, नागरिकांनाही दैनंदिन गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी व सुलभ दरात उपलब्ध होणार आहेत. परिणामी शहरातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

oppo_0

हा निर्णय नगरध्यक्षा सौ. रश्मी शंतनू कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, सर्व नगरसेवक-नगरसेविका, नगरपालिका प्रशासन तसेच सर्व जागरूक नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाला आहे. या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सर्व व्यापारी, स्टॉलधारक व नागरिकांनी या आठवडा बाजाराचा लाभ घ्यावा, स्वच्छता राखावी व नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

oppo_0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…