Home Uncategorized ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

8 second read
0
0
232

कोल्हापूर : माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच) संगणक प्रणालीव्दारे प्रत्यक्ष राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि. 13 सप्टेंबर 2022 (मंगळवार).

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)- दिनांक 21 सप्टेंबर 2022 (बुधवार) ते दि. 27 सप्टेंबर 2022 (मंगळवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (दिनांक 24 सप्टेंबर चा शनिवार व दिनांक 25 सप्टेंबरचा रविवार वगळून).

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)- दिनांक 28 सप्टेंबर 2022 (बुधवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुन अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)- दिनांक 30 सप्टेंबर 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजेपर्यंत.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ- दिनांक 30 सप्टेंबर 2022 (शुक्रवार) दुपारी 3 नंतर.

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दिनांक 13 ऑक्टोबर 2022 (गुरुवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत. (नक्षलग्रस्त भागासाठी सकाळी 7.30 वा. पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत)

मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)- दिनांक 14 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक -19 ऑक्टोबर 2022 (बुधवार) पर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…