मलकापूर प्रतिनिधी:
सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घडामोडी जनमाणसा पर्यंत पोहचवणे . याबरोबरच जनजागृतीच्या माध्यमातून विविध बाबीचे वास्तव मांडून आपले कर्तव्य आणि जबाबदारी पत्रकार बांधव नेहमी पार पाडत असतात .असे प्रतिपादन मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांनी पत्रकार गौरव समारंभ प्रसंगी केले . पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की समाजात असणाऱ्या विविध बाबीना न्याय देण्याचं काम पत्रकाराच्या माध्यमातून केले जात आहे.

याबरोबरच शासकीय योजना असतील विविध शासकीय माहिती सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमाचा विशेष सहभाग असतो. शासन , प्रशासन आणि जनता यामध्ये समन्वय साधण्याच महत्त्वपूर्ण काम देखील प्रसारमाध्यम करत असते आणि पत्रकार हे समाजातील एक महत्त्वाचे घटक आहेत.
प्रारंभी उपस्थित पत्रकार बांधवांचा वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.या प्रसंगी वनपाल पी .बी चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावित केले.
यावेळी पत्रकार शाम पाटील ,उमेश नांगरे , रमेश डोंगरे ,संतोष कुंभार ,रोहित पास्ते आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास वनपाल सदानंद जगताप , नाथा पाटील , लेखपाल एम बी पाटील , वनसेवक शंकर लवटे यांच्या सह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



