Home Uncategorized मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्याची मागणी

मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्याची मागणी

3 second read
0
0
110

मलकापूर प्रतिनिधी:

मलकापूर नगरपरिषद कार्यालयात नागरिकांसाठी योग्य बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगरसेवक रविराज नानासो कोकरे देसाई यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी मा. मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मलकापूर नगरपरिषद कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्‌तास उभे राहावे लागते.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व आजारी नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. नगरपरिषद कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्यामुळे गैरसोयीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच नगरपरिषद कार्यालयाच्या दर्शनी भागात किंवा आवारात योग्य ठिकाणी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना आपल्या कामासाठी प्रतीक्षा करताना बसण्याची सुविधा मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व आरोग्य दोन्ही जपले जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत मा. नगराध्यक्ष यांनाही माहितीस्तव देण्यात आली असून, नगरपरिषद प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…