Home Uncategorized शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांचा जोर…

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांचा जोर…

3 second read
0
0
43

शिरोळ : प्रतिनिधी

समृध्द शहराची संकल्पना आणि विकासाची दूरदृष्टी घेवून जनतेसमोर भ्रष्टाचारमुक्त शिरोळ आणि पारदर्शी कारभार करण्यासाठी नगरपालिकेच्या निवडणुकीत एकवेळ संधी द्यावी अशी भावनिक साद घालून शिव शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे प्रमुख युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी काढलेल्या जनसंवाद फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता शिरोळात फक्त पृथ्वीराजसिंह यादवांचच वारं… अशी चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे.

पृथ्वीराजसिंह यादव यांनी समविचारी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुकीसाठी यादव पॅनेलची निर्मिती केली आहे. कर्तृत्वाने निष्कलंक आणि समक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.

गेल्या पाच वर्षाच्या कारभारात सत्ताधाऱ्यांकडून झालेला भ्रष्टाचार यामुळे जनतेत परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. यामुळेच यादव पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना जनतेचे पाठबळ मिळत आहे. प्रभाग क्रमांक १ मधून पृथ्वीराजसिंह यादव स्वतः निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…