Home Uncategorized शिरोळच्या विकासासाठी श्वेता काळे योग्य नेतृत्व : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर… राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळच्या विकासासाठी श्वेता काळे योग्य नेतृत्व : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर… राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

4 second read
0
0
31

शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि उच्चशिक्षित महिलाच शहराचे नेतृत्व करावे, आणि अशा नेतृत्वक्षम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता काळे या आहेत, असे मत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ हे ऐतिहासिक आणि झपाट्याने वाढणारे शहर असून गेल्या काही वर्षांत शहरात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती मिळाली आहे. शिरोळ नगरपरिषदेला जुन्या तहसील कार्यालयाची जागा व इमारत उपलब्ध करून देणे, भुयारी गटार योजना, कल्लेश्वर तलावाचे सुशोभीकरण, तसेच नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नळपाणी योजनेचे पूर्णत्व अशा विविध कामांमुळे शिरोळ शहराचा चेहरा बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक प्रभागातून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आघाडीची सत्ता एकहाती येणार असल्याचा पूर्ण विश्वास आहे. नागरिकांचा वाढता विश्वास आणि सहभाग पाहता शिरोळ शहराचा आगामी काळात कायापालट निश्चित आहे, असे ते म्हणाले.

शहराच्या विकासप्रवासाबाबत आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले की, विकासाची गंगा अखंडपणे वाहती ठेवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करणे अत्यंत आवश्यक आहे. शहराचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनुभवी, कार्यक्षम आणि जबाबदार नेतृत्वाची आज तातडीने गरज आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, उच्चशिक्षित महिला उमेदवार श्वेता काळे यांच्यात शहराचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्याची प्रबळ क्षमता आहे. शिरोळच्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना काम करण्याची संधी दिली तर शहराला नवी दिशा मिळेल. महिला नेतृत्वाने शहराला विकास आणि संवेदनशील प्रशासनाचा नवा चेहरा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रचारफेरीदरम्यान नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळमध्ये प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले. शहराचे सर्वांगीण विकास, नागरिकांची अपेक्षा पूर्ण करणे आणि शिरोळला आधुनिक व प्रगत शहर बनवण्याची जबाबदारी आघाडी समर्थपणे पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…