Home Uncategorized शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू आघाडी एकमेव पर्याय : माजी आमदार उल्हासदादा पाटील

शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू आघाडी एकमेव पर्याय : माजी आमदार उल्हासदादा पाटील

3 second read
0
0
17

शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपपरिषदांपैकी सर्वाधिक निधी प्राप्त करून विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन माजी आमदार उल्हास पाटील यांनी मतदारांना केले. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारदौऱ्याला शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठा प्रतिसाद मिळात आहे.

शिरोळ शहरात गेल्या काही वर्षांत विविध मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर शहराने विकासाच्या नकाशावर झपाट्याने वाटचाल करताना राज्य शासनाकडून सर्वाधिक निधी मिळवण्याचा मान पटकावला आहे.
शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा विस्तार, भुयारी गटार योजनेची अंमलबजावणी, जुन्या तहसील कार्यालयात नगरपालिका स्थलांतरासाठी आवश्यक जागेचे हस्तांतरण, तसेच कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण यांसारख्या कामांमुळे शहराचा चेहरा बदलला आहे. विविध समाजघटकांसाठी सांस्कृतिक हॉलची उभारणी, शहरातील रस्ते, प्रकाशव्यवस्था, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा यामुळे शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले, शिरोळ शहराचा विकास हा सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेणे गरजेचे आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीने विकासाच्या नावाने एकही प्रकल्प अडवला नाही. शहरवासीयांच्या गरजांची जाणीव ठेवून प्रत्येक क्षेत्रात उन्नती साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा प्रवास पुढेही वेगाने आणि परिणामकारकतेने व्हावा यासाठी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होणे अत्यावश्यक आहे.

शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्वेता काळे तसेच सर्व प्रभागांतील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आगामी निवडणुकीत शिरोळ शहराचा विकास अधिक व्यापक स्वरूपात करण्यासाठी शाहू आघाडीचे उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन करत उल्हास पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…