Home Uncategorized शिट्टीला निवडून द्या : लाडक्या बहिणींचे मानधन वाढवणार : नामदार हसन मुश्रीफ

शिट्टीला निवडून द्या : लाडक्या बहिणींचे मानधन वाढवणार : नामदार हसन मुश्रीफ

3 second read
0
0
114

शिरोळ : प्रतिनिधी
राज्य सरकारने लाडक्या लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक सक्षम केले आहे. आज पर्यंत अखंडितपणे त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत, लाडक्या बहिणींनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास लाडक्या बहिणीचे मानधन १५०० वरून २१०० रुपये करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शिरोळ येथील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, नगरसेवक हा रस्ते गटारी तयार करून पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला दुरुस्त करणारा नसावा, तर शासनाच्या विविध योजना गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचवणारा असावा आणि ते काम राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासन अनेक योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवत आहे शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे दोन्ही बंधू त्यांच्या विश्वासातील आहेत, त्यामुळेच एवढा निधी शिरोळ तालुक्याला मिळाला आहे. तसेच शिरोळ शहरात विकासासाठी भरगोस निधी दिला आहे, यापुढेही शिरोळ नगरपालिकेची विकास गंगा वाहती ठेवण्यासाठी सर्वांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन देखील त्यांनी शेवटी बोलताना केले.


याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीतच अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार निवडून आले आणि जवळजवळ २०० कोटी रुपयांचा निधी शिरोळ शहराला मिळाला. शहरातील नळ पाणीपुरवठा, जुन्या तहसील कार्यालयाची इमारत नगरपालिकेच्या ताब्यात देणे, भुयारी गटार योजना यासह विविध विकासकामे आणि प्रामुख्याने कलेश्वर तलावाचे सुशोभीकरण सर्व समाजाला सांस्कृतिक हॉल हॉलचे बांधकाम करून शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. या पुढील काळात ही विकासगंगा सुरू ठेवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या या पुढील काळात भरीव निधी शिरोळ शहराला देऊ, अशी ग्वाही दिली. व या पुढील काळात यापेक्षाही गतिमान विकास करू असे सांगितले.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याला भेडसावणारे महापुराचे संकट राज्य शासनाने समन्वय साधून टाळले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने शिरोळ शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यापुढेही हा विकास सुरू ठेवण्यासाठी शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

प्रारंभी स्वागत अमरसिंह पाटील यांनी केले. आभार रणजीत पाटील यांनी मानले. सभेपूर्वी शिरोळ शहरातील प्रमुख मार्गावरून नामदार हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, अमरसिंह पाटील, रणजीत पाटील यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता काळे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व हजारो कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रकाश पाटील टाकवडेकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता काळे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…