Home Uncategorized सौ. सारिका माने यांना विजयी करा : सागर कोळी यांचे आवाहन

सौ. सारिका माने यांना विजयी करा : सागर कोळी यांचे आवाहन

3 second read
0
0
37

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या ताराराणी आघाडीच्या उमेदवार सौ. सारिका अरविंद माने यांना विजयी करावे असे, आवाहन हसूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांनी केलं आहे.

सागर कोळी मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, ताराराणी आघाडी ही सर्वसामान्य जनतेनं उभी केलेली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे उमेदवार हे लोकहिताचं काम करतील, असा माझा विश्वास आहे. एकवेळ संधी दिली तर नक्कीच ते त्या संधीचं सोनं करतील. राज्यात आणि देशात ज्या विचाराचं सरकार आहे. त्याच विचाराची आघाडी शिरोळमध्ये निवडून येणं अपेक्षित आहे. जेणेकरुन विकासकामांना निधी पुष्कळ मिळेल.

आ. डॉ. अशोकराव माने यांच्यावर शिरोळ गावानं नेहमी जिवापाड प्रेम केलं आहे. तशीच संधी सौ. सारिका माने आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांना निवडणुकीत द्यावी आणि हे पॅनेल विजयी करावं, असं आवाहन अखेरीस कोळी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…