Home Uncategorized शाश्वत विकासासाठी शिवशाहू यादव पॅनेलला विजयी करा… पॅनेलप्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांचे आवाहन…

शाश्वत विकासासाठी शिवशाहू यादव पॅनेलला विजयी करा… पॅनेलप्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांचे आवाहन…

3 second read
0
0
30

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळच्या शाश्वत विकासासाठी आणि दिर्घकालीन चांगली कामं गुणवत्तेची होण्यासाठी आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, खुप प्रामाणिकपणे पॅनेलचे उमेदवार निवडले आहेत. माझा विश्वास आहे. त्यांच्याकडून पारदर्शक काम होईल. संधी द्या, आम्ही सोनं करु, असं मत शिवशाहू यादव पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी संवादादरम्यान व्यक्त केले.

यादव म्हणाले, आम्ही लोकांशी संवाद ठेवत आहोत. तो माझ्या पराभवाच्या दिवसापासून. लोकांतून बाजूला गेलो नाही. खुप कष्ट झाले, त्याग करावा लागला, अनेक संकटांचा सामना मला करावा लागला, संघर्षही झाला पण, शिरोळ शहरातील जनतेनं मला एकटं पडू दिलं नाही. नेहमी साथ आणि सहकार्य केलं. कुठली साधनं नसताना आज पॅनेलला चांगले उमेदवार मिळाले. आमच्या नेत्यांनी साथ दिली, भक्कम पर्याय घेवून आपण लोकांसमोर चाललो आहे.

मोठी संकल्पना माझ्या डोक्यात आहे. आमच्या शिरोळ शहराला मोठा इतिहास आहे. हे शहर राज्यातील टॉप टेन शहरात गेलं पाहिजे. सरकारी योजनांचा लाभप्रत्येक परिवारापर्यंत पोहचला पाहिजे यासाठी माझ्या आयुष्याचा सगळा क्षण मी देतोय. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्वच उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…