Home Uncategorized नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सारिका माने यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सारिका माने यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित

3 second read
0
0
43

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ येथील नगरपालिका निवडणुकीतील अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सारिका माने व इतर ताराराणीं आघाडीचे उमेदवार विजयी व्हावेत याकरिता डॉ. अरविंद माने यांनी जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित केले असून ते स्वतः या प्रचार यंत्रणेत अग्रभागी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याकरिता शिरोळ शहरातून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. अरविंद माने हे स्वतः या प्रचार यंत्रणेत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह वाढला आहे. ते वैयक्तिक गाठीभेटी व मतदाराशी थेट संपर्क साधण्यावर भर देत असून शिरोळ शहराच्या विकासाकरिता चाराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करावे असे ते जागोजागी आवाहन करीत आहेत. भाजपामध्ये त्यांनी अनेक पदे भूषवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय वरिष्ठांच्य बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध असून शहराच्या विकासाकरिता निधी आणि च्या कामी ते कमी पडणार नाहीत असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सारिका माने यांचे सासरे दलित मित्र आमदार अशोकराव माने हेही प्रचारामध्ये सक्रिय झाले असून त्यांनीही प्रत्यक्ष व दूरध्वनी द्वारे भेटून महायुती ताराराणीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन सुद्धा ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…