Home Uncategorized जोरदार शक्ती प्रदर्शनासह नगराध्यक्ष पदासाठी संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जोरदार शक्ती प्रदर्शनासह नगराध्यक्ष पदासाठी संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

4 second read
0
0
55

जयसिंगपूर : कुणाल कांबळे
जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी शनिवारी दिमाखदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील नागरिक, कार्यकर्ते, तसेच विविध घटकांतील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यड्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून गेले. ढोल-ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे पोहोचली. तेथे संजय पाटील यड्रावकर यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला. त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले की, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे. नागरिकांच्या सुविधा वाढवणे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच शहराचा एकूण चेहरामोहरा उंचावण्यासाठी सातत्याने काम झाले आहे. आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे,असे त्यांनी ठामपणे सांगितले.

माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच मान्यवर नेते आघाडी बरोबर असल्यामुळे आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितले.

नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल समाधान व्यक्त करत यड्रावकर म्हणाले की, जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच मी निवडणुकीला सामोरे जात आहे. जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाषसिंह राजपूत, रणजीतसिंह पाटील, प्रमोददादा पाटील, सुभाष भोजने, शितल गतारे, मिलिंद भिडे, असलम फरास, काँग्रेसचे अमरसिंह निकम, अमरदीप कांबळे, अण्णासाहेब क्वाने, शैलेश आडके, राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र आडके, प्रकाश झेले, रमेश यळगुडकर, मिलिंद शिंदे, ॲड. संभाजी नाईक, धनाजीराव देसाई, राहुल बंडगर, आप्पासो खामकर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, महेश कलकुटगी, अर्चना भोजने, जुलेखा मुल्लाणी, प्रियांका धुमाळे, साजिदा घोरी, हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, फारूक कडबी यांच्यासह पदाधिकारी व संख्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…