Home Uncategorized सामाजिक बांधिलकी जोपासणारी हसूरची ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्था… स्व. ए. पी. पाटील यांच्या जयंतीनिमित १०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सामाजिक बांधिलकी जोपासणारी हसूरची ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्था… स्व. ए. पी. पाटील यांच्या जयंतीनिमित १०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

4 second read
0
0
122

शिरोळ प्रतिनिधी : कुणाल कांबळे

हसूर : येथे स्व. ए.पी.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन बाबासो पाटील यासह संचालक मंडळ….

हसूर ता. शिरोळ येथील ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी
पतसंस्था, ए.पी.पाटील सर्वोदय चॅरीटेबल ट्रस्ट आणि डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ए.पी. पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित हसूर हायस्कूल भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रारंभी स्व. ए. पी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन बाबासाहेब पाटील यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी एम.एस.आय. ब्लड सेंटर मिरज व तुलशी ब्लड बँक जयसिंगपूर,व हिरेमट हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.

सर्वसामान्य व गरजू लोकांचे हित जपण्याचा वारसा मनामध्ये घेऊन सर्वोदय परिवाराच्या वतीने ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सह पत संस्था, मर्यादित हसुर ए.पी.पाटील सर्वोदय चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर यासारखे उपक्रम दरवर्षी राबवले जातात.

सन २०२४-२५ या सालात हसुर व पंचक्रोशीतील नागरिकांना वैद्यकीय मदत म्हणुन डोळ्यांचे ऑपरेशन व गरजु रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करुन देणे, क्रीडा स्पर्धांसाठी आर्थिक मदत, क्रीडा साहित्य वाटप, शैक्षणिक मदत म्हणुन जिल्हा परिषद व शाखा स्तरावर असणारे हायस्कूल शाळेसाठी विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय, साहित्य वाटप असे अनेक उपक्रमांद्वारे आर्थिक केली जाते. सामाजिक व धार्मिक कार्यात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाना पाण्याचे बॉटल, फराळाचे साहित्य वाटप केले जाते. तसेच नांदणीचे माधुरी उर्फ महादेवी हत्तीच्या पदयात्रेत पाणी बॉटल वाटप करून धार्मिक कार्यात सहभागी घेऊन नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

यावेळी चेअरमन बाबासो पाटील, विजय माणगावे,आप्पासो चौगुले, सुरेंद्र भंडे, धनाजी भोसले,भरत पाटील, शिवाजी पाटील, महावीर पाटील, सुभाष शिरगावे, दादासो खटावणे, उत्तम पाटील, सुनिल नेजे, पारीसा बोरगावे, मोहन पाटील, रमेश चौगुले, आशिष सावंत, अनिकेत पाटील, अभिजित पाटील,नेमिनाथ कुमठाळे, संदिप पाटील, राजाराम चौगुले, हसुर हायस्कूलचे मुख्याध्यापक महावीर खुरपे तसेच सर्वोदय पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांचे स्वागत प्रज्योत माणगावे, यांनी केले. सूत्रसंचालन रमेश चौगुले यांनी केले. तर आभार अनिकेत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…