Home Uncategorized सुपार्श्व सोशल फाउंडेशन – दोस्ती ग्रुपच्या पुढाकारातून शिरटीतील ११८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सुपार्श्व सोशल फाउंडेशन – दोस्ती ग्रुपच्या पुढाकारातून शिरटीतील ११८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

4 second read
0
0
239

शिरोळ : कुणाल कांबळे
शिरटी ता. शिरोळ येथील सुपार्श्व सोशल फाऊंडेशन आणि दोस्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.अनंत सूर्यवंशी व स्व. विनोद चौगुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ११८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या शिबिराचे उद्घाटन उद्योजक भरत माणगावे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, बोलताना सुपार्श्व सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक विनोद मगदूम (मगदूम ज्वेलर्स) म्हणाले की, फाउंडेशनच्या वतीने नेहमी विविध समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. यापुढील काळातही फाऊंडेशनची वाटचाल लोकहिताच्या दृष्टिकोनातून चालू राहणार असून वेळगवेळगळे उपक्रम राबविले जातील.


यावेळी सुपार्श्व फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद मगदूम (मगदूम ज्वेलर्स) उपाध्यक्ष महावीर बागे, सरपंच शुभांगी शिरगावे , माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, उपसरपंच प्रकाश माळी, वीर सेवादल मध्यवर्तीचे चेअरमन विजय पाटील (हसुर), वीर सेवादल मध्यवर्तीचे माजी व्हा. चेअरमन सुभाष मगदूम, उद्योजक संजय देवमोरे, प्रमोद उदगावे, अमित शिरगावे, कुपदीप बनीजवाडे, राजकुमार शिरगावे, निखिल पाटील, रवी पाटील, अनिल चौगुले, रमेश सूर्यवंशी, संदीप चौगुले, अमोल जगनाडे, यांच्यासह सुपार्श्व फाउंडेशन व दोस्ती ग्रुपचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…