Home Uncategorized विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे सहभाग.

विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे सहभाग.

4 second read
0
0
73
या कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, चेतन नरके, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, एस.आर.पाटील, अमरसिंह पाटील, क्रांतिसिंह पाटील, सत्यजित पाटील, बाबासाहेब देवकर, तुकाराम पाटील, अमर पाटील, कुंभी कासारीचे संचालक किशोर पाटील, दादासो लाड, सरपंच सचिन पाटील दिसत आहेत.

शिरोली दु. ता.१८: गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत शिरोली दुमाला (ता. करवीर ) येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. शिबिरात ५७५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

      यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. रक्तदानाबद्दल जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी विश्वास पाटील अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, हे निश्चितच समाजाभिमुख कार्य असल्याची चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी अशा ५७५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले हे रक्तदान शिबिर कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठे रक्तदान ठरले आहे.

      यावेळी विश्वास पाटील (आबाजी), सौ.ऊर्मिला पाटील, तुकाराम पाटील, सरपंच सचिन पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील व संपूर्ण पाटील कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती होती. सहभागी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अर्पण ब्लड बँक व श्री महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी केले.

      यावेळी उपस्थित गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, चेतन नरके, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, एस.आर.पाटील, अमरसिंह पाटील, मुरलीधर जाधव, क्रांतिसिंह पाटील, सत्यजित पाटील, बाबासाहेब देवकर, सत्यजित पाटील, अमर पाटील, कुंभी कासारीचे संचालक किशोर पाटील, दादासो लाड, एस.डी.जरग, बुद्धीराज पाटील, सुभाष पाटील, नंदकुमार पाटील, माधव पाटील, एस.के.पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच रयत कृषी संघाचे संचालक, पाटील कुटुंबीय व भागातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते व गौरव समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे रूप पालटणार, डांबरीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. ज…