
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ शहर व परिसरात प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरणाचा समतोल राख यज्ञ या तहणे महत्त्वाचे आहे. याकरिता वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे. शिरोळ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या वतीने माझी वसुंधरा या अभियांतर्गत शहरात वृक्षारोपण करीत शहरात हिरवाई आणण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले. शिरोळ नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्यावतीने येथील पीएमश्री छत्रपती विद्या मंदिर नं.३ या शाळेत सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत भाट हे बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्रा. के. एम. भोसले, सचिव अमित जाधव, सदस्य सचिन सावंत, अनिल महाजन, शिरोळ नगर परिषदेचे समन्वयक साहिल मकानदार, शिवसेना महिला आघाडी शिरोळ शहर प्रमुख सौ. हेमलता जाधव, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अध्यापिका सौ. सविता जाधव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. साहिल मकानदार, मुख्याध्यापिका सौ. तेजस्विनी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी शाळेचे अध्यापक यशवंत कांबळे, फिरोज कादरभाई, , सुरेखा येळगुडे, जयश्री पेटकर, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिलीप कोळी, अध्यक्ष उदय माळी, उपाध्यक्ष स्वाती कोळी, शैलेजा कोरोचीकर, गुलनाज शेख, स्नेहल कोळी, आरती आरगे, अमर नरळे, संतोष सप्तसागर, विशाल कोळी उपस्थित होते.


