Home Uncategorized कनवाड गावात जमाअत-ए-इस्लामी हिंद तर्फे पूरग्रस्तांना घरे प्रदान

कनवाड गावात जमाअत-ए-इस्लामी हिंद तर्फे पूरग्रस्तांना घरे प्रदान

6 second read
0
0
25

जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र ही सामाजिक व धार्मिक संस्था गेल्या ७५ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकसेवेत कार्यरत आहे. संस्थेतर्फे २०१९ साली आलेल्या महापुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करण्यात आली होती. त्याच काळात शिरोळ तालुक्यातील कणवाड गाव हे जमाअतकडून दत्तक घेण्यात आले होते.

सन २०२०-२१ मध्ये संस्थेतर्फे गावातील ३४ गरजू कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली, तर यंदा (२०२५) आणखी ३ कुटुंबांसाठी घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या नव्या घरांचे हस्तांतरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमास जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही आणि उपाध्यक्ष हसीब भाटकर व कनवाड गावचे सरपंच इरफान बुरान यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


हा कार्यक्रम कनवाड ग्रामपंचायत हॉलमध्ये पार पडला. या वेळी अध्यक्षांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या आणि फीत कापून गृहप्रवेश देण्यात आला. कार्यक्रमास जमाअतचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी जमाअतच्या या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…