प्रतिनिधी, कृष्णा लाड

विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदा घेऊन सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आजची सभा वादळी होईल असे संकेत होते. पण विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष पीएन पाटील उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर आणि संचालक मंडळाने योग्य उत्तरे दिली त्यामुळे सभा न गुंडाळता जवळपास साडेचार तास चालली.
सुरुवातीला कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी अहवाल आणि मागील सभा प्रोसिडिंग वाचन केले. त्यानंतर सभेच्या सुरुवातीला प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी प्रश्न उपस्थित करताना भोगावती साखर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत अनेक बाबतीत मागे असून कर्जाच्या बाबतीत मात्र दरवर्षी पुढे जात असल्याचे चित्र दुर्दैवी असून याबाबत संचालक मंडळाने योग्य ती कारवाई करण्याचे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संबधित सर्व दाखले दिले.
त्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी 64 महिने सभासदांना साखर मिळालेली नाही कामगार पगार ही सहा महिन्यांचा देणे आहे तर संचित तोटा वाढतोच आहे याकडे लक्ष वेधले. तर दिस्लारी चालू करावी. को जनरेशन प्रकल्प सुरू करावा अशी सूचना केली. बग्यास व मोल्यासिस मध्ये सेविंग झालेली नाही याकडे संचालक मंडळाने लक्ष द्यावे. तसेच अपात्र सभासदांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी एक तर त्यांना त्यांची रक्कम परत द्या किंवा त्यांचे शेअर ट्रान्सफर करा अशी महत्त्वाची मागणी त्यांनी केली.कारखान्याची माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी बोलताना सध्याची आकडेवारी पाहिली तर कारखाना काटकसरीने चालवला आहे असं म्हणता येत नाही असं सांगितले. कारखान्याचा साखर सोडून दुसरा पदार्थ निर्मिती प्रकल्प नसल्यामुळे कारखान्यावर आर्थिक बोजा वाढतो आहे असे निदर्शनास आणले. यासाठी रिकवरी वाढवणे हा एकच उपाय असल्याने त्याकडे संचालक मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे असे नमूद केले.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले कारखान्यावर कोणाचीही सत्ता असो चळवळीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे आणि तो जपला पाहिजे या भावनेने आम्ही कार्यरत आहोत अजूनही खरेदी विक्री मध्ये तफावत दिसते आहे तर संचालक मंडळाकडून वास्तूंचे मूल्यांकन वाढवून जास्तीत जास्त कर्ज घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसतो आहे पण सदरचे कर्ज फेडण्यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत असे म्हणणे मांडले.अजित पाटील परीतेकर यांनी संचालक मंडळाने धाडसाने कर्जाचा खरा आकडा सभासदासमोर सांगावा अशी मागणी करून साखर आणि उपपदार्थां विक्री दरांमध्ये तफावत आढळते आहे असे नमूद केले. तर हप्ते वेळेवर न भरल्यामुळे व्याजाचा आकडा वाढतो आहे असे दाखवून दिले.कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले म्हणाले इतर कारखान्यांनी कमीत कमी कर्ज काढून जास्तीत जास्त एफआरपी देण्याचा प्रयत्न केला पण आपल्या संचालक मंडळाकडून असा कोणताही प्रयत्न झाला नाही असा प्रश्न उपस्थित केला. तर काटकसरीचा कारभार केला असे म्हणतात तर दरवर्षी कर्ज वाढतच आहे असं का असाही प्रश्न उपस्थित केला. तर कारखाना हितासाठी येणारी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वच पक्षांनी आग्रही भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
कारखाना संचालक प्रा. सुनील खराडे यांनी कारखान्यात सभासद हिताचा कारभार सुरू असून कारखाना पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये असल्याचे सांगितले त्यांनी पब्लिक स्कूल ही आता अधिक चांगल्या प्रकारे सुरू असल्याचा दाखला दिला. तर गत निवडणुकीमध्ये आमदार पी एन पाटील यांच्याकडे सत्ता आली नसती तर हा कारखाना केव्हाच खाजगी तत्त्वावर चालवायला द्यावयास लागला होता असे सांगून आमचा कारभार चोखच असल्याचे स्पष्टपणे सांगितले.शेवटी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलकर यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची सडेतोड आणि समर्पक योग्य उत्तरे दिली. आणि कर्ज असले तरी देखील पी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आणले. कर्जाचा बोजा कमी करन्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त क्रशिंग अत्यावश्यक असल्याने सर्वांनी गट तट पक्ष न पाहता आपला ऊस भोगावतीस गाळपसाठी पाठवा असे आवाहन केले.
येत्या गळीत हंगामात सहा लाखांवर क्रशींग करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करूया तर मागील हप्त देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले. कारखान्यातील ताडपत्री चोरी प्रकरणी संबंधितावर कडक कारवाई केल्याचे आणि कथित साखर चोरी झाली नसल्याचे सांगितले.यानंतर सभेचे सर्व विषय बहुमताने मंजूर झाले कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी आभार मानले. झालेल्या चर्चेमध्ये निवास पाटील हळदीकर pd चौगुले, केरबा भाऊ पाटील,अशोकराव पवार पाटील, बीके डोंगळे आदींनी सहभाग घेतला. अशा तऱ्हेने भोगावती सहकारी साखर कारखाना परितेची 67 वार्षिक सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांच्याहजारो सभासदांच्या उपस्थितीमध्ये खेळी मेळीत संपन्न.