Home Uncategorized मंडळानी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे: अप्पासाहेब पवारपन्हाळा पोलीस ठाण्याच्या गणराया अवॉर्डचे वितरण

मंडळानी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे: अप्पासाहेब पवारपन्हाळा पोलीस ठाण्याच्या गणराया अवॉर्डचे वितरण

8 second read
0
0
88

पन्हाळा : प्रतिनिधी सचिन वरेकर

मंडळाच्या कार्यकर्त्यानी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करत पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे प्रतिपादन शाहूवाडी उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी केले. ते पन्हाळा पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित गणराया अवॉर्ड वितरणप्रसंगी बोलत होते. यावेळी मागील वर्षी गणेशोत्सवात विशेष कामगिरी करण्याऱ्या मंडळांना गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम रबावावेत.जेणेकरून त्यातून समाजप्रभोधन होईल. तसेच मिरवणुकीसाठी साउंड सिस्टीमचा वापर, नृत्यगना तसेच ईर्षा दाखवण्यासाठी कोणतेही अनुचित कृत्य करूनये. अशा प्रकारावर पोलिसांचे लक्ष असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास अगर कोणत्याही ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जातील. त्यामुळे प्रत्येक मंडळाने नियमांचे पालन करत व पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण करावा असे सांगितले. तर नायब तहसीलदार संजय वळवी यांनी समाज प्रबोधन पर उपक्रम राबवत मंडळानी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन केले. तसेच पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी लेझर लाईट मुळे होणारे दुष्परिणाम सांगत यावेळच्या मिरवणुकीत लेझर लाईटला बंदी असल्याचे सांगितले. व मिरवणुकीसाठी ध्वनी प्रदूषण कायद्यातील ध्वनी मर्यादा ओलांडणार नाही अशी वाद्ये व पारंपारिक वाद्य वाजवण्या यावीत. तसेच सर्वच मंडळांनी विसर्जन मिरवणुका दिलेल्या निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात व प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळी सहकार्य करावे असे आवाहन केले
गणराया अवॉर्ड सन २०२४ चा प्रथम क्रमांक सिद्धीविनायक तरुण मंडळ – तिरपण (पारंपरिक वाद्याचा कार्यक्रम व उत्तम मिरवणूक) व्दितीय क्रमांक यशस्वी तरुण मंडळ – यवलुज (सांस्कृतिक व पारंपरिक )तर तृतीय क्रमांक धर्मवीर तरुण मंडळ पन्हाळा-( डॉल्बीला फाटा व पर्यावरणपूरक,परंपारिक गणेशोत्सव) मानकरी ठरले तर गणेश कला क्रीडा मंडळ – चौगलेवाडी कोलोली, जय शिवराय तरुण मंडळ -उंड्री,सहारा ग्रुप-माळवाडी कोतोली ,रणझुंजार तरुण मंडळ – कसबा ठाणे,हिंदवी मित्र मंडळ-पन्हाळा,विश्वशांती तरुण मंडळ-वाघवे,सावकार मित्र मंडळ-इब्राहिमपूर पेठ या मंडळांना त्यांच्या मार्गात राबवल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक, परंपारिक गणेशोत्सव व समाजप्रबोधन कार्यक्रमासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उप निरीक्षक महेश कोंडूभैरी यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…