Home Uncategorized हेरवाडमध्ये २४ रोजी गांवभागच्या राजाचा आगमन सोहळा

हेरवाडमध्ये २४ रोजी गांवभागच्या राजाचा आगमन सोहळा

4 second read
0
0
99

शिरोळ : प्रतिनिधी
हेरवाड (ता. शिरोळ) येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार दि. २४ रोजी नवसाच्या गांवभागच्या राजाचा आगमन सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. हेरवाड येथील हा गणपती “नवसाचा गणपती” म्हणून प्रसिद्ध असून, भक्तांच्या नवसाला तो लवकर पावतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आगमन सोहळ्याबाबत गावात मोठ्या उत्सुकतेचे वातावरण आहे.
हेरवाडमधील गांवभागचा राजा हा गणपती भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान मानला जातो. अनेक भक्तांनी या गणपतीला सोन्या–चांदीच्या दागिन्यांची तसेच विविध मौल्यवान वस्तू अर्पण केलेल्या आहेत. त्यामुळे या गणपतीचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी गणेशोत्सव रौप्यमहोत्सवी वर्षात साजरा होत असल्याने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष आकर्षण म्हणून शिरोळ तालुक्यात प्रथमच श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. भक्तांसाठी हे एक वेगळेच पर्व ठरणार आहे. आगमन सोहळ्यानंतर मंडळाच्या वतीने दररोज धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, आरत्या तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेरवाडमधील एकता गणेशोत्सव मंडळाने मागील पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले असून, या परंपरेला यंदाही कायम ठेवले जाणार आहे. गावातील नागरिक, भाविक व भक्तमंडळींच्या सहभागामुळे गांवभागच्या राजाचा हा आगमन सोहळा यंदा ऐतिहासिक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…