Home Uncategorized प्रबोधनकारानी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष केला नाही :डॉक्टर सरावणे

प्रबोधनकारानी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष केला नाही :डॉक्टर सरावणे

4 second read
0
0
66


दूधगंगानगर तालुका राधानगरी येथील श्री सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल दूधगंगानगर येथे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची १३७ वी जयंती संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.बी. सरावणे हे होते अध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रबोधनकार यांनी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा व्देष केला नाही ते पुढे म्हणाले प्रबोधनकार हे नैतिक वर्तनाचे भोक्तेच तेच नव्हे तर कट्टर समर्थक होते नीती चा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणतात की आपणासी इतरांनी जसे वागावे अशी आपली अपेक्षा असते तसेच आपणही त्यांच्याशी सख्ख्या भावाच्या भावनेने निदान माणुसकीच्या भावनेतून तरी वागले पाहिजे प्रबोधनामुळे त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते प्रबोधन म्हणजे कर्तृत्ववान पुरुष छायाचित्रकार पत्रपंडित वाद-विवाद पटू संपादक पत्रकार समाजसुधारक वक्ते नेते पटकथा संवाद लेखक चरित्रकार इतिहासकार अशा अनेक विशेषणाने त्यांना ओळखले जाते त्यांनी लिहिलेल्या माझी जीवनगाथा कोंदडाचा टणत्कार संत गाडगे बाबांचे चरित्र शेतकऱ्यांचे स्वराज्य धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म खरा ब्राह्मण रंगो बापूजी अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहे . कार्यक्रमाची अवचित साधून प्रतीक्षा पाटील, अंकिता पिरळकर, तनुजा गायकवाड, शंतनू महाडिक यांचा दहावीत अनुक्रमे क्रमांक आल्याने सत्कार करण्यात आला तर को जी मा शि शाखा सरवडे पतसंस्थेच्या शाखा संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
यावेळी मुख्याध्यापक एम बी चौगले, मोहन कांबळे, अनिल चव्हाण, राजाराम सरावणे , दाऊद नंदकर, संजय कांबळे निवास कांबळे, तानाजी मोहिते सह शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकुश पाटील यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…