Home Uncategorized जिल्हा पोलीस प्रमुखांकडून समाजभूषण डॉ. दगडू माने यांचा सत्कार

जिल्हा पोलीस प्रमुखांकडून समाजभूषण डॉ. दगडू माने यांचा सत्कार

4 second read
0
0
69

जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील सहकार महर्षी शामराव पाटील -यड्रावकर नाट्यगृह येथे आगामी गणेशोत्सव निमित्ताने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव मंडळांची बैठक व गणराया अवॉर्ड पुरस्कार वितरण समारंभ झाला. यावेळी राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ दगडू माने यांचा सत्कार जिल्हा पोलीस प्रमुख मा. योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ माने यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी डॉ माने यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास आमदार डॉ राजेंद्र पाटील – यड्रावकर, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड शिरोळ, सत्यवान हाके जयसिंगपूर , शरद मेमाणे हातकणगले, प्रमोद शिंदे वडगाव यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्यक्रमाच्या निवेदिका रेखाताई गायकवाड, बबन यादव तसेच जयसिंगपूर विभागीय पोलिस कार्यक्षेत्रातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…