Home Uncategorized शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

3 second read
0
0
244

शिरोळ : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते , सिनेअभिनेते व प्र.के.अत्रे सर्वोत्कृष्ट पुरस्कार सन्मानित डॉ. दगडू श्रीपती माने यांना जाहिर झाला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह (नरिमई पॉईंट ) येथे मंगळवारी १० जून रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालयाने पत्रकार डॉ दगडू माने यांना लेखी पत्र पाठवले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर ,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नगर विकास वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ, लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.मुंबई येथे होणाऱ्या या समारंभाला ,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदिप कांबळे , समाज कल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आदर्शवत कार्य केले आहे. महापूर व कोविड काळात पूरग्रस्त व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. लोकहितार्थ सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता व पत्रकार म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून नाटक , पथनाट्य व लोककलेच्या माध्यमातून त्यांनी रंजनातून प्रबोधन चळवळ राबवली आहे. त्याशिवाय चित्रपट , वेबसिरीज व लघुचित्रपटातून त्यांनी विशेष भूमिका साकारली आहे. शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या फुले – शाहू – डॉ आंबेडकर चळवळीच्या कार्यात कार्यकर्ता म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे.

गोरगरिब, निराधार व दिव्यांग यासह जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या लोकसेवेच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ दगडू माने यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…