दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या जीवनावर आधारित लेखक सुभाष धुमे यांनी लिहिलेल्या ‘परिवर्तनाच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते.
यावेळी बोलताना उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, शेतीमधला कशाचाही गंध अथवा अनुभव नसताना माझे वडील कैलासवासी आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासूनच शेती करण्याचा सल्ला दिला. या शेतीमधूनच आपणांस शेतकऱ्यांची प्रगती करायची आहे. शाळा शिकून मोठा ऑफिसर बनायचं माझं स्वप्न होतं. परंतु, वडिलांचा आदेश म्हणून मी शेतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. वडिलांनी देशातील अनेक ठिकाणी शेती नवनवीन प्रकारे कशी करतात, याचे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतः मला घेऊन जात होते. माझे आई-वडील हेच माझे गुरु असून त्यांच्यामुळेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच मी यामध्ये यशस्वी झालो असल्याचे मत, गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ‘ परिवर्तनाच्या वाटेवर ‘ या पुस्तकाचे लेखन सुभाष धुमे यांचा दत्त सहकार कारखान्याच्या वतीने उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, अशोकराव कोळेकर, शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ, विश्वजीत शिंदे, सुभाष धुमे यांनी मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाइस चेअरमन अरुण देसाई, संचालक शेखर पाटील, दरगु गावडे, महेंद्र बागी, ज्योतीकुमार पाटील, अमर यादव, संचालिका अस्मिता पाटील, वरूण पाटील, निजामसो पाटील, बाबासो पाटील, बाळासाहेब बनगे, विलास माने यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे



