Home Uncategorized श्री दत्तच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र पाठक यांची एकमताने निवड…

श्री दत्तच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र पाठक यांची एकमताने निवड…

4 second read
0
0
178

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदुर) यांची तर व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. कारखान्याचे माजी चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.

श्री दत्त साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार सकाळी नूतन संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नूतन चेअरमन रघुनाथ पाटील व व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांचा सत्कार केला. तर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल कारखान्याच्यावतीने सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार केला उपस्थित संचालकांनी नूतन चेअरमन पाटील व व्हा. चेअरमन पाठक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले की, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याच्या सभासदांचा विश्वस्त म्हणून आमच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे भर पावसात सुद्धा उत्साहाने सभासद मतदानासाठी आले होते. कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि सभासद व कामगारांच्या हितासाठी नेहमीच आम्ही विश्वस्त म्हणून पारदर्शक कारभार करणार आहोत. कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी कारखान्याचे कामगार यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कारखाना विश्वस्त मंडळाच्यावतीने त्यांनी सर्वांचेच आभार मानले.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सचिव अशोक शिंदे, कारखान्याचे संचालक सहकारमहर्षी गणपतराव पाटील,अमर यादव, अनिलकुमार यादव, अरुणकुमार देसाई, बाबासो पाटील, बसगोंडा पाटील, दरगू माने-गावडे, जोतीकुमार पाटील, निजामसो पाटील, प्रमोद पाटील,शेखर पाटील,सिद्धगोंडा पाटील,श्रीमती विनया घोरपडे, विश्वनाथ माने सौ अस्मिता पाटील,सौ संगीता पाटील (कोथळीकर), सुरेश कांबळे, इंद्रजीत पाटील,रणजीत कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…