Home Uncategorized राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा नंबर 6 उघडला

राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा नंबर 6 उघडला

2 second read
0
0
100

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून जोरदार सुरुवात केली. आज (दि. ११) सकाळी ११ वाजल्यानंतर धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. या दरवाजातून १४२८ क्युसेक्स तर विजगृहातून १६०० क्युसेकस असा एकूण ३०२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासांत 79 मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर 3913 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…