Home Uncategorized राधानगरी धरणाचे गेट क्र. 6 व 3 स्वयंचलितपणे उघडले – नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

राधानगरी धरणाचे गेट क्र. 6 व 3 स्वयंचलितपणे उघडले – नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

3 second read
0
0
464

प्रतिनिधी – मिलिंद कांबळे,

राधानगरीदि. 25 जुलै 2025 | रात्री 10.05 वा.राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजे क्रमांक 6 व 3 आज रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी उघडले गेले आहेत.धरणातून सध्या सेवाद्वार क्र. 6 व 3 मधून 2856 क्युसेक्स आणि BOT पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक्स, असा एकूण 4356 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी, मासेमारी करणारे व जलसंपदेसाठी काम करणारे नागरिकांनी नदी पात्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…