Home आरोग्य पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने सावधानतेचा इशारा

पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने सावधानतेचा इशारा

3 second read
0
0
129

कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर)

कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ०७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः ८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.०० वा. पासून मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सकाळी ११.०० पासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत ५ फूट ७ इंचाने वाढ झाली आहे.

तरी, नदीकाठच्या गावातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देणेत येत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयातील तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूःसख्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरीकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…