Home राजकारण कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

10 second read
0
0
1,279

कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणात विक्री होतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणार्‍या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. खासदार धनंजय महाडिक यांनी, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली.


कोल्हापूरच्या विमानसेवेचा आता गतीने विस्तार होत आहे. कोल्हापूरहून तिरूपती विमान सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर नागपूर आणि गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी आता पूर्ण होणार आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या विमान सेवेमुळे अहमदाबाद सोबतच संपूर्ण गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेने कनेक्ट होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. सध्या कोल्हापूर- बेंगलोर, कोल्हापूर – हैद्राबाद, कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर- तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात आल्या असून, त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात ही सेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उडाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोचेल. तसेच अहमदाबादहून १२ वाजून ४५ मिनिटांनी विमान उडेल आणि २ वाजून ५ मिनिटांनी कोल्हापुरात पोचेल. त्यासाठी तिकीटाचे बुकींग सुरू झाल्याचीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…