Home Uncategorized नामदेव शिंपी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

नामदेव शिंपी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

3 second read
0
0
121

जयसिंगपूर : प्रतिनिधी
श्री संत नामदेव शिंपी समाजाचा सर्वांगीण विकास साधत असताना समाजातील प्रत्येक तरुण शिक्षित झाला पाहिजे यासाठी आपल्या पारंपरिक व्यवसायात न गुंतता युवकांनी नवनवीन उद्योग उभे करून आपला व आपल्या समाजाचा विकास साधला पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कठीबद्ध राहीन, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले..जयसिंगपूर येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते.

प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दिंडी सोहळा व मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजाच्या भवनाला भरीव निधी दिल्याबद्दल समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार पुढे म्हणाले, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या विचारांचा वारसा हा समाज पुढे नेत आहे. आजच्या काळातील युवा पिढी सुधारण्यासाठी अध्यात्म महत्वाचे आहे. हा समाज नेहमीच अध्यात्माचा माध्यमातून जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. या समाजाच्या भवन बांधकामासाठी योगदान देण्याचे भाग्य मला लाभले आहे. या पुढेही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेन, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

२२ जुलै पासून संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, २२ रोजी नामदेव समाज महिला भजनी मंडळाचे भजन संपन्न झाले. यानंतर बुधवारी संत शिरोमनी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर काढण्यात आलेली दिंडी व भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. दिवसभरात समाधी सोहळ्यात कीर्तन, आरती, महाप्रसाद तसेच समाजातील जेष्ठ नागरिकांचा व नव दांपत्य व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री नामदेव समाज उन्नती मंडळ, श्री संत नामदेव महिला मंडळ, श्री संत नामदेव युवक मंडळाने परिश्रम घेतले..या कार्यक्रमास श्री संत नामदेव समाजाचे अध्यक्ष सुनील वायचळ, दत्तात्रेय पोरे, अनंत गणबावले, प्रवीण गणबावले, बंडू उरुणकर,दादा पाटील चिंचवाडकर, ॲड.गजानन आंबेकर, राहुल बंडगर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…